आशियातील (Asia) सर्वात मोठा (Defence Expo) यावर्षी गुजरातच्या (Gujarat) गांधीनगर (Gandhinagar) मध्ये पार पडणार आहे. तरी 18 ऑक्टोबर (October) ते 22 ऑक्टोबर 2022 या दरम्यान डिफेन्स एक्स्पो (Defence Expo) पार पडणार आहे. या डिफेन्स एक्स्पोच्या माध्यमातून जनतेला एरोस्पेस (Aerospace) आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात सामील होण्यासाठी प्रेरित करण्याचा उद्देश आहे. तसेच भारताच्या संरक्षणातील ‘आत्मनिर्भरता’साठी या डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. तरी काल दिल्लीत (Delhi) यासंबंधीची एक महत्वाची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान, संरक्षण सचिवांना द्विवार्षिक कार्यक्रमासाठी अनेक भागधारकांद्वारे केलेल्या व्यवस्थेची माहिती देण्यात आली. डॉ. अजय कुमार (Dr. Ajay Kumar) यांनी अधिकार्‍यांना डिफेक्‍स22 (Defence Expo 2022) ला उत्‍कृष्‍ट यशस्‍वी बनवण्‍यासाठी व्‍यवसायावर लक्ष केंद्रित करण्‍यासाठी आणि स्‍वदेशी डिफेन्स प्‍लॅटफॉर्म (Defence Platform) आणि उत्‍पादनांची निर्यात वाढविण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍याचे आवाहन केले आहे.

 

डिफेन्स एक्स्पो 2022 (Defence Expo 2022) ची थीम 'पाथ टू प्राइड' आहे. म्हणजे पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) भारतीय एरोस्पेस (Indian Aerospace) आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी समर्थन, प्रदर्शन (Exhibition) आणि भागीदारी करून भारताला (India) एक सशक्त आणि स्वावलंबी राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. तसेच जागतिक ग्राहक, देशांतर्गत संरक्षण उद्योगाचे सामर्थ्य दाखविणे हा यामागचा उद्देश आहे जो आता सरकार आणि देशाच्या ‘मेक इन इंडिया (Make In India), मेक फॉर द वर्ल्ड (Make For The World) संकल्पनेला मजबूत बनवत आहे.

 

यंदा डिफोन्स एक्स्पोमध्ये ((Defence Expo) केवळ स्वदेशी अर्थात भारतीय कंपन्या सहभागी होणार आहेत. डिफेन्स एक्स्पोमध्ये फक्त भारतीय कंपन्या सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वदेशी कंपन्यांव्यतिरिक्त, त्याचं विदेशी ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असलेल्या (OEM) कंपन्या यामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्या विदेशा कंपन्यांचा भारतीय कंपनीसोबत संयुक्त प्रकल्प आहे किंवा त्यांची उपकंपनी कंपनी भारतात आहे, अशा कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होऊ शकतील.