जम्मू आणि कश्मीर ( Jammu and Kashmir) येथील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनाला अपघात झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत लष्करी ट्रकला भीषण आग (Army Truck Catches Fire) लागली. ट्रकला आग लागल्याने किमान तीन ते चार जवानांचा मृत्यू झाला. राजौरी-पुंछ हायवे (Poonch district) ओलांडत असताना ही घटना घडली. लष्करी वाहनाला नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली याबाबत पुरेसा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, डोंगराळ भागात मुसळधार पावसाच्या दरम्यान मेंढर उपविभागातील भाटा धुरियन धबधबा येथे वीज कोसळल्याने वाहनाला आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे.
घटनेबाबत हाती आलेली प्राथमिक माहिती अशी की, राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर पूंछ 13 सेक्टर पासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळी दाखल झाले आहेत मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. (हेही वाचा, भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार जवानांचा मृत्यू; सर्च ऑपरेशन सुरू)
व्हिहिओ
VIDEO | Indian Army vehicle catches fire in Jammu and Kashmir's Poonch sector. More details are awaited. pic.twitter.com/E4gyvthM54
— Press Trust of India (@PTI_News) April 20, 2023
Casualties feared as an Indian Army truck catches fire in Poonch district of Jammu & Kashmir
Details awaited. pic.twitter.com/QgVwYQIZQ4
— ANI (@ANI) April 20, 2023
पीटीआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवरुन सदर घटनेचा व्हिडिओही ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये लष्कराचे एक वाहान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे पाहायला मिळते. वाहनाच्या आजूबाजूला काही सैनिकही असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते.