पंजाबच्या भटिंडा मिलिट्री स्टेशन (Bathinda Military Station Firing) मध्ये आज पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आर्मी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच 4.35 च्या सुमारास क्विक रिअॅक्शन टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली. त्यानंतर भटिंडा मिलिट्री स्टेशन सील करण्यात आले. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. सध्या या भागाला छावणीचं स्वरूप आले आहे. मृतांच्या कुटुंबियांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
सैन्याकडून पंजाब पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नाही. फायरिंग 80 मीडियम रेजीमेंट आर्टिलरी ऑफिसर्स मेसमध्ये झाली आहे. काही दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या खोलीतून एक असॉल्ट रायफल गायब झाली होती. त्याच रायफलने फायरिंग झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. गोळीबार करणाऱ्याचा तपास सुरू आहे.
Bathinda Military Station firing incident | The families of jawans killed in the incident are being informed about the loss of lives: Indian Army
— ANI (@ANI) April 12, 2023
भटिंडा मिलिटरि स्टेशन वरील हा प्रकार दहशतवादी हल्ला नाही त्यामुळे यावरून कोणत्याही अफवा पसरवल्या जात असतील तर त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Armed Force Vacancy: भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये तब्बल 1.55 लाख पदे रिक्त; संरक्षण राज्यमंत्र्यांची माहिती .
भटिंडा मिलिट्री कॅम्प हा देशातील सर्वात मोठा लष्कराचा तळ म्हणून ओळखला जातो. हे स्टेशन जयपूरच्या दक्षिण पश्चिम कमांडच्या अधिकार क्षेत्राखाली येते. चंदीगड-फजिलका हायवेच्या शेजारी असलेल्या या कॅम्पला सध्या सील करण्यात आले आहे. आता हा हल्ला कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला आहे याची तपासणी सुरू आहे.