भारतीय लष्करामध्ये तुकडीचे नेतृत्व करण्याची कमान महिलांकडे देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार- लष्करप्रमुख एमएम नरवणे
लष्करप्रमुख एमएम नरवणे (Photo Credits-ANI)

भारतीय लष्करामध्ये तुकडीचे नेतृत्व महिलांकडे देण्यावरुन केंद्र सरकारने नकारत्मक भुमिका घेण्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने लष्करामध्ये महिलांना समान संधी देण्यात यावी असे आदेश दिले होते. त्यानंतर यावर आता लष्करप्रमुख एमएम नरवणे (MM Naravane) यांनी विधान केले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत करत महिलांना लष्कर तुकडीचे नेतृत्व करण्याची कमान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे हे आमचे प्रथम काम असल्याचे म्हटले आहे. महिला अधिकाऱ्यांसह भारतीय सेनेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला देशाची सेवा करण्यासाठी समान संधी मिळेल असे आश्वासन नरवणे यांनी दिले आहे.

सुप्रीम कोर्टाने 18 फेब्रुवारीला महिलांना लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी असा आदेश दिला होता. कॉम्बेट रोल सोडून अन्य क्षेत्रात महिलांना स्थायी कमीशन देण्यात येणार आहे. लष्करातील महिलांना समान हक्क देण्यासाठी कायदेशीर लढाई गेल्या 17 वर्षांपासून सुरु होती. भारतीय सेना कोणत्याही सैनिकासोबत जात, धर्म, जात, संप्रदाय किंवा लिंग वरुन भेदभाव करत नाही. तर 1993 मध्ये महिल अधिकाऱ्यांची भरती सुरु केली होती. भारतीय सेनेने सर्व क्षेत्रात महिलांना उच्चस्थानी ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.(Women Officers in Army: भारतीय लष्करामध्ये तुकडीचं नेतृत्त्व महिलांकडे देण्यावरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; 3 महिन्यात कमिशन स्थापन करण्याचेही आदेश)

ANI Tweet:

तसेच जम्मू-कश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेत सुद्धा घट झाल्याचे नरवणे यांनी सांगितले आहे. भारतीय सेनेकडून नेहमीच दहशतवाद्यांना सीमेवर सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. एवढेच नाही तर चीनला सुद्धा आता कळून चुकले आहे की नेहमीच पाकिस्तानला समर्थन देणे योग्य नाही आहे. त्यामुळे आता पाकिस्तान त्यांच्या रणनितीवर पुन्हा विचार करेल असे ही नरवणे यांनी म्हटले आहे.