Modi Cabinet Portfolio Change: PM नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खांदेपालट, Kiren Rijiju यांच्या जागी Arjun Ram Meghwal यांची कायदामंत्री म्हणून निवड
Kiren Rijiju | File Image

Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बदलानुसार किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना केंद्रीय कयदा (Law Minister) मंत्रीपदावरुन बाजूला करण्यात आले असून, त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांची निवज केली आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कारभार सोपवला जाणार आहे. राष्ट्रपती भवनातून याबाबत माहिती देण्यात आली.

किरेन रिजिजू

केंद्रीय मंत्रिमंडळात किरेन रिजिजू यांनी यांनी 8 जुलै 2021 रोजी कायदा आणि न्याय मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्या आधी त्यांनी मे 2019 ते जुलै 2021 या कालावधीत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम पाहिले होते. पुढे त्यांना कायदा मंत्री पदावर बढती देण्यात आली. हेच किरेन रिजिजू आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पोर्टफोलिओ सांभाळतील.

ट्विट

रिजिजू हे विद्यमान आणि निवृत्त न्यायमूर्तींबद्दलच्या टिप्पणीमुळे चर्चेत आले होते. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही ते कॉलेजियमबद्दल म्हणाले होते. देशातील प्रत्येकजण संविधानानुसार काम करतो असे म्हणत निवृत्त न्यायाधीशांबाबतही त्यांनी विधाने केली होती. त्यांनी म्हटले होते की, काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत, त्यानंतर रिजीजू यांच्याकडून पदभार काढून घेत त्यांच्यावर दुसऱ्या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली.