काँग्रेस नेते जगनमोहन रेड्डी यांच्यावर विमानतळावर चाकूहल्ला
जगनमोहन रेड्डींवर चाकूहल्ला (Photo Credit : ANI)

वायएसआर काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्यावर एका इसमाने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. विशाखापट्टनम विमानतळावरुन बाहेर पडत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर त्याने हल्ला केलेला चाकूही जप्त केला आहे. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. पण यामुळे विमानतळावरील व्हीआयपी लोकांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

विमानतळावरील कँटीनमध्ये जगनमोहन रेड्डींवर हल्ला झाला. रेड्डी यांच्यासोबत एका व्यक्तीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि रागात या इसमाने धारदार चाकूने रेड्डींवर हल्ला केला. यावेळी तिथे रेड्डींसोबत त्यांचे समर्थकही होते. या हल्ल्यांनंतर तिथे गोंधळ उडाला. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.