Sex With Corpse: महिलेची हत्या करुन मृतदेहासोबत सेक्स, आंध्र प्रदेश राज्यातील घटना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

महिलेचा गळा आवळून हत्या केल्यावर तिच्या मृतदेहासोबत सेक्स (Sex With Corpse) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी विशाखापट्टनम जवळील बी कोट्टलहकोटे (B Kottahakote) जवळील लावरापल्ली (Iravarapalli ) गावात ही घटना घडली. या प्रकरणी शंकराप्पा नावाच्या एका 29 व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. हा व्यक्ती मजूर म्हणून काम करतो.

प्राप्त माहितीनुसार, शंकराप्पा या मजूराने त्याच्या मित्राकडून 18 ऑक्टोबर रोजी 5000 हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. हे पैसे घेतल्यावर त्याने गावातीलच एका बिअर बारमध्ये खपू प्रमाणात मद्यसेवन केले. त्यानंतर तो तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही शंकराप्पा याने खूप प्रमाणात मद्यसेवन केले. नशेमुळे तो झाडाखालीच झोपला. दरम्यान, आपल्या खिशातील पैसे आणि मोबाईल हरवल्याचे त्याच्या लक्षात आले.

मोबाईल शोधत शोधत तो शेतात पोहोचला. या ठिकाणी त्याला दोन महिला आणि एक मुलगी शेतात काम करत असल्याचे दिसले. तो त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलू लागला. दरम्यान, हवामान ढगाळ होते. पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शेतातील एक महिला आपल्या मुलीसोबत निघून घरी गेली. तर दुसरी महिला छत्री सोबत असल्याुळे शेतातच काम करु लागली.

दरम्यान, रिमझिम पाऊस सुरु झाला. संबंधित महिला छत्री उघडून झाडाच्या आडोशाला गेली. आरोपी शंकराप्पाही तिथे पोहोचला. पावसाचे वातावरण आणि एकटी महिला पाहून त्याने महिलेचा विनयभंग गेला. तिने विरोध केला असता त्याने तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. त्यानंतर महिलेचा मृतदेह शेतात नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

(हेही वाचा, नालासोपारा येथे महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहासोबत Sex करणाऱ्या दुकानदाराला अटक)

शेतात गेलेली महिला बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही. त्यामुळे तीचा पती आणि घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. हे सर्वजण शेतात पोहोचले असता तिचा मृतदेह मिळाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शविविच्छेदनासाठी पाठवला. महिलेची हत्या करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा नोंद शवविच्छेदन अहवालातून पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी शंकराप्पा याला ताब्यात घेतले पुढील तपास सुरु आहे.