आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली. या घटनेमुळे अनकापल्ली गावातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून, अस्वलाला परिसरातून न हटवल्यास आणखी हल्ले होण्याची भीती आहे. सीएच लोकनाधाम आणि लैशेट्टी कुमार अशी पीडितांची नावे असून ते जवळच्या उद्यानात जात असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उद्दान परिसरात अस्वलाच्या पिल्लांच्या उपस्थितीबद्दल स्थानिकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. (हेही वाचा - BJP Booth President Dies in Bull Attack: बैलाच्या हल्ल्यात भाजपच्या बूथ अध्यक्षाचा मृत्यू; उत्तर प्रदेशातील घटना)
उड्डनमच्या रहिवाशांनी सरकारला त्वरीत कारवाई आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. अस्वलाच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा वन अधिकारी निशा कुमारी यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली जाईल, असे कुमारी यांनी सांगितले. 2022 मध्ये, वज्रपुकोत्तुरू मंडल अंतर्गत किडीसिंगी गावात काजू बागेत काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अस्वलाने हल्ला केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या परिसरात अस्वल आणि इतर जनावरांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यात नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.