BJP Booth President Dies in Bull Attack: बैलाच्या हल्ल्यात भाजपच्या बूथ अध्यक्षाचा मृत्यू; उत्तर प्रदेशातील घटना
Bull प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

BJP Booth President Dies in Bull Attack: उत्तर प्रदेशातून (Uttar Paradesh) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लालपूर गावात बैलाच्या हल्ल्यात (Bull Attack) भाजप बूथ अध्यक्षाचा (BJP Booth President) मृत्यू झाला. मुकेश अवस्थी असं मृत भाजपा बूथ अध्यक्षाचं नाव आहे. बैलाने हल्ला केला तेव्हा मुकेश अवस्थी घराबाहेर बसले होते. दरम्यान, या घटनेच्या एक दिवसाआधी बिधनूच्या घाटुखेडा येथे बैलाच्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला होता.

प्राप्त माहितीनुसार, लालपूरचे रहिवासी असलेले 55 वर्षीय मुकेश अवस्थी हे भाजपचे बूथ अध्यक्ष होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजता ते घरासमोरील मैदानात बसले होते. दरम्यान, एक बैल घरात घुसू लागला. त्यामुळे मुकेश यांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैलाने त्यांना उचलून फेकले. (हेही वाचा -Bull Attack Video: भटक्या बैलाचा वृध्द व्यक्तीवर हल्ला, भीषण घटनेत पीडितेचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल)

मुलगा शुभम याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना भितरगाव सीएचसीमध्ये नेले. तेथून त्यांना कानपूरला रेफर करण्यात आले. एलएलआर रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकारी सुधीर कुमार यांनी सांगितले. (हेही वाचा - Odisha Bull Attack: ओडिशा जाजपूर देवडा येथे भटक्या गुरांचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू)

दरम्यान, मुकेश यांची पत्नी प्रभा चहा बनवत असताना बैलाने हल्ला केला. त्यांना या हल्ल्याची कल्पना नव्हती. मुकेश यांच्या निधनानंतर अवस्थी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुकेश यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा शिवम मर्चंट नेव्हीमध्ये असून नोएडामध्ये प्रशिक्षण घेत आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच तो घराकडे रवाना झाले. तसेच दुसरा मुलगा शुभम घरीच राहतो. मुकेश अवस्थी यांच्या निधनाने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.