Andhra Pradesh: सरकारी रुग्णालयात 14 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजनचा कमतरता असल्याची बाब नाकारण्यास प्रशासनाचा प्रयत्न
Death | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील एका सरकारी रुग्णालयात शनिवारी 14 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. असे सांगितले जात आहे की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ही अफवा असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट सुद्धा दिली. त्यांनी असे म्हटले की, ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात अफवा पसरवण्यांच्या विरोधात तपास सुरु केला आहे. ही घटना अनंतपुर मधील सरकारी रुग्णालयातील आहे. येथे पोहचलेल्या सहजिल्हाधिकारी निशांत कुमार यांनी असे म्हटले की, आमची टीम ऑक्सिजन प्लान्टचा तपास करत आहे. आमच्या टीमकडून वॉर्डचा दौरा सुद्धा केला. आम्ही प्रत्येक लाइन आणि वॉल्वचा योग्य प्रकारे तपास केला. तेथे कोणताही लीकेज नाही आहे. ऑक्सिजन प्लांटचे प्रेशर सुद्धा योग्य आहे. पुरवठ्यात कोणतीच समस्या नाही आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले की, आज झालेल्या मृत्यूचा ऑक्सिजन सोबत संबंध नाही आहे. आज एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे वय अधिक असण्यासह त्यांना गंभीर आजार सुद्धा झाले होते. यामुळेच हे मृत्यू ऑक्सिजनमुळे झालेले नाहीत. आम्ही स्वत: तपासणी केली आहे. हे योग्य नाही की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला आहे. दुर्भाग्याने ही गोष्ट योग्य आहे की, मृतांचा आकडा जास्त आहे. मात्र ऑक्सिजनची कमतरता हे त्याचे कारण नाही आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्ये बहुतांशजणांना डायबिटीस, हृदयाचे आजार आणि कार्डियक अरेस्ट सारख्या समस्या होत्या.(दिल्लीत 77 सरकारी शाळांमध्ये उद्यापासून होणार कोरोना लसीकरण)

दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी गंधम चंद्रूडू यांनी म्हटले की, शनिवारी सकाळी एक व्हिडिओ तयार केला. त्याचसोबत जिल्हा प्रशासनाला जबाबदार ठरवण्यात आले. माझ्याकडे काही मेसेज सुद्धा आहेत. काही लोकांनी मुद्दाम भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने आणि हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही याचा तपास करत आहोत. यामध्ये जो कोणीही जबाबदार असेल त्याच्या विरोधाक कार्यवाही केली जाणार आहे. 20 दिवसांपूर्वी ऑक्सिजन पाइपलाइन सिस्टिमचा तपास APMSIDC यांनी केला होता आणि ते योग्य असल्याचे सांगितले होते. फायर सेफ्टी बद्दल सुद्धा सुरक्षितता केली जात आहे.