गेल्या काही दिवसांपासून भुकंपाच्या धक्काने हादरणाऱ्या मिझोरम (Mizoram) राज्याला पुन्हा एकदा भुकंपाचा धक्का बसला आहे. आज सकाळी 8.2 मिनिटांनी मिझोरम मधील चंपाई (Champhai) येथे भुकंपाचे धक्के जाणवले. हा भुकंप 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. चंपाईतील 31 किमी दक्षिण-पश्चिम भागात भुकंपाचे केंद्र होते. अशी माहिती National Center for Seismology यांनी दिली आहे. या भागात गेल्या 48 तासांत भुकंपाचे तीन धक्के बसले आहेत. यापूर्वी बसलेला भुकंपाचा धक्का 3.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. हा भुकंप सेरछिप जिल्ह्यातील Thenzawl या भागात झाला होता.
22 जून रोजी देखील मिझोरममध्ये 5.5 रिश्टर स्केलचे भुकंपाचे हादरे जाणवले होते. तर 19 जून रोजी झालेला भुकंप 5.0 रिश्टर स्केलचा होता. या भुकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक ठिकाणी रस्तांना तडे गेले असून घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान पुढील 5 दिवसांत मिझोरममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (मिजोरम राज्याला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के, भूकंप मापन यंत्रावर 5.5 तीव्रतेची नोंद)
ANI Tweet:
An earthquake of magnitude 4.1 on the Richter scale struck 31 km South South-West (SSW) of Champhai, Mizoram at 08:02 am today: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/OggEydyssE
— ANI (@ANI) June 24, 2020
मागील काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या भुकंपाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि डीओएनईआर मंत्री जितेंद्र सिंह यांनी मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्याशी चर्चा केली होती. तसंच केंद्राकडून मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे.