Amritpal Singh (Photo Credit - Twitter ANI Video)

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंगला (Amrutpal Singh) फरार घोषित करण्यात आलं असून त्याच्या सहकाऱ्यांना अटक करुन दिब्रुगढ (Dibrugadh) या ठिकाणच्या जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी अमृतपालच्या शोधासाठी मोठी मोहिम हाती घेतली असून तरी त्यांना यामध्ये काही यश येतान दिसत नाही. अशातच अमृतपाल सिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हरियाणाच्या (Hariyana) कुरूक्षेत्रातील (Kurukshetra) शाहाबाद परिसरातील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओत अमृतपाल सिंग निळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात एक छोटी पिशवी आणि काळी छत्री दिसत आहे.

पहा व्हिडीओ -

अमृतपाल सिंग आणि त्याचा सहकारी पापलप्रीत सिंग यांना आश्रय दिल्याप्रकरणी बलजीत कौर या महिलेला पोलिसांनी कुरूक्षेत्र येथील शाहबाद परिसरातून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. कुरूक्षेत्रातून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हरियाणा पोलिसांकडून देण्यात आली आहे.