यंदा 25 मार्च पासून चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri) सुरूवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक भाविक जम्मू कश्मीर येथे वैष्णो देवीच्या यात्रेला (Shri Mata Vaishno Devi Yatra ) जातात. मात्र यंदा देशभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ असल्याने यंदाची वैष्णो देवी यात्रा स्थगित करत असल्याचे जम्मू कश्मीर सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी जम्मू मधून इतर राज्यात येणार्या आणि जाणार्या बस सेवा आज (18 मार्च) पासून खंडीत करण्यात आल्या आहेत.दरम्यान वैष्णव देवी मंदिराप्रमाणेच देशभरासह महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाची देवस्थानं, मंदिर, धार्मिक स्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोव्हिड 19 हा आजार झपाट्याने पसरू शकतो या भीतीमुळे प्रशासनाकडून वैष्णवदेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.Coronavirus: कोरोनामुळे भक्तांना मंदिरात प्रवेश नाही! आता देहूचे तुकोबा तर, आळंदी येथील माऊली मंदिर 31 मार्च पर्यंत राहणार बंद.
भारत देशामध्ये सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 148 असून सर्वाधिक रूग्ण 42 रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी देशात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून अन्य रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
ANI Tweet
Department of Information and Public Relations, Government of Jammu & Kashmir: Shri Mata Vaishno Devi Yatra has been closed from today. Operations of all inter state buses, both incoming and outgoing from J&K, are banned from today. #Coronavirus pic.twitter.com/mAnaZ2nhfJ
— ANI (@ANI) March 18, 2020
भारतातील वाढती कोरोना व्हायरसची भीती पाहता रविवारी भाविकांसाठी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास असलेल्या भाविकांना प्रवेश रोखण्यात आला होता. आता दिवसागणिक घट्ट होणारा कोरोना व्हायरसचा धोका कमी करण्यासाठी प्रशसनाकडून नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्यासोबतच देशांर्तगत आणि परदेशी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.