Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अमेरिकन-इंग्लिश व्लॉगर जोडपं Mackenzie आणि Keenan यांनी केरळमध्ये त्यांचा लैंगिक छळ झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी 19 एप्रिल रोजी झालेल्या केरळच्या प्रसिद्ध Thrissur Pooram महोत्सवात सहभागी होताना लैंगिक छळाचा सामना केल्याचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. UNSTUK with Mac & Keen', या जोडप्याने उत्सवादरम्यान अनुभवलेल्या छळाच्या दोन घटनांची माहिती दिली आहे.

Thrissur Pooram चा व्हिडिओ त्यांनी ‘Questionable Moments at Thrissur Pooram’ या टायटल खाली टाकला आहे.त्यामधील दाव्यानुसार "आम्ही

Thrissur Pooram चे काही अद्भुत क्षण अनुभवले, परंतु काही शंकास्पद क्षणही होते." यात मॅकेन्झी एका उत्सवातील सहभागीची मुलाखत घेत असल्याचे चित्रित केले आहे, जो नंतर तिला जबरदस्तीने किस घेण्याचा प्रयत्न करतो. मॅकेन्झी आणि कीनन या दोघांनीही या घटनेदरम्यान अस्वस्थता व्यक्त करत आवाज उठवला आहे.

व्हिडीओमध्ये, कीननने खुलासा केला की उत्सवात त्याला एका व्यक्तीने देखील घेरले होते. हा व्यक्ती सुमारे पन्नाशी मधील होता. TNM नुसार, थ्रिसूर पोलिसांनी सांगितले की व्लॉगर्सनी अद्याप औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. Karnataka: डच व्लॉगरला बेंगळुरूच्या चिकपेट भागात मारहाण, नागरिकांनी मदत केल्यानंतर म्हणाला 'जय श्री राम' .

"स्थानिक लोकांप्रमाणे जगणे आणि जगभरातील खरी संस्कृतीचा वेध घेणे" या मोहिमेवर ते असल्याचे हे जोडपे सांगते. या मोहिमेवर भर देत त्यांच्या प्रवास केरळ मध्ये सुरू होता. त्यांनी येथील स्थानिक गोष्टी टिपल्या आहेत. मार्चमध्ये, मॅकेन्झीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात केरळच्या प्रवाशांसाठी, विशेषत: महिलांसाठी सुरक्षिततेचा दावा केला होता. “माझ्या अमेरिका आणि इंग्लंडमधील मित्र विचारतात की एक स्त्री म्हणून भारतात प्रवास करणे सुरक्षित आहे का? मी म्हणेन, केरळमध्ये 100%. बाकी भारताबद्दल मला अजून खात्री नाही. पण इथे मला खूप सुरक्षित वाटतं. [जेव्हाही] मी रात्री रस्त्यावर चालत आहे, अर्थातच मी सावध आहे, परंतु मला खूप सुरक्षित वाटते,” असे ती म्हणाली होती.