Amarinder Singh Meets Amit Shah: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 45 मिनिटे बातचीत झाली. पंजाब मध्ये राजकरण सध्या तापले असून अशातच कॅप्टन अमरिंदर सिंह यांची अमित शहा यांची भेट ही महत्वाची मानली जात आहे. येथून मी घरी जाणार आहे. सामान एकत्रित करुन पंजाबला जाणार आहे.
दरम्यान, हे दोन्ही नेत्यांची भेट अशावेळी झाली जेव्हा पंजाब काँग्रेस मध्ये राजकरण सुरु आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवजोत सिद्धू यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या काही तासांच्या आतमध्ये पंजाब काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला.(Navjot Singh Sidhu Resigns: नवज्योत सिंग सिद्धू यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा)
अमरिंदर सिंह हे मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. तेव्हा त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, ते येथे कोणत्या नेत्याची भेट घेणार का तेव्हा त्यांनी नकार दिला. राजकीय चर्चा फेटाळून लावत असे म्हटले की, मी कोणत्याही नेत्याची भेट घेणार नाही आहे.
अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्या मधील वाद कोणपासून लपला गेला नव्हता. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर निशाणा साधत अमरिंदर सिंह यांनी म्हटले की, ते एक अस्थिर आणि खतरनाक व्यक्ती आहेत. सीमावर्ती राज्य पंजाब चालवण्यासाठी ते लायक नाही आहेत.
सिद्धू यांचा राजीनामा हा एक नाटक असल्याचे सांगत अमरिंदर सिंग यांनी असेही म्हटले होते की, त्यांच्या या हालचालीवरून असे दिसून आले आहे की ते काँग्रेस सोडण्याची आणि विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या पक्षात सामील होण्याची भूमिका बजावत आहेत. त्यांनी एका विधानात असे म्हटले की, मी वारंवार सांगत आहे की ते अस्थिर आणि खतरनाक व्यक्ती आहेत. तसेच पंजाब चालवण्याची जबाबदारी सोपवू शकत नाही.