सपा चे माजी नेते अमर सिंह यांनी आपल्या निधनांच्या अफवांवर दिले स्पष्टीकरण, व्हिडिओ ला दिले दबंग खानच्या Hit चित्रपटाचे कॅप्शन, Watch Video
Amar Singh (Photo Credits: Twitter)

समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह (Amar Singh) यांच्या निधनाच्या कित्येक अफवा गेल्या काही दिवसांपासून फिरत होत्या. त्या सर्व अफवांना फाटा देत त्यांनी स्वत: आपल्या सोशल मिडियाच्या अकाउंटवरुन ट्विट केले. या ट्विटमध्ये आपला एक व्हिडिओ शेअर करुन 'टायगर जिंदा है' असे कॅप्शनही दिले. तसेच आमचे जे मित्र आमच्या मृत्यूची अफवा पसरवून आमच्या मृत्यूची इच्छा बाळगतात त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. मी एकदम स्वस्थ असून लवकरच बरा होईल असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले आहे, असे अमर सिंह या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून तेथून हा व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर ट्विट केला आहे.

या व्हिडिओत त्यांनी "मी त्रस्त आहे मात्र मी घाबरलेलो नाही. माझ्यात हिंमत बाकी आहे, जोश बाकी आहे आणि भानही बाकी आहे. त्यामुळे माझे जे शुभचिंतक माझ्या निधनाच्या अफवा पसरवत आहे आणि यमदेवाने मला त्याच्या जवळ बोलावले असे म्हणत आहे यात काहीच तथ्य नाही. माझ्यावर उपचार सुरु आहे" असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अमर सिंह याच्याकडून 12 कोटी रुपयांची संपत्ती राष्ट्रीय सेवा भारती संस्थेला दान

या व्हिडिओला त्यांनी दबंग सलमान खानच्या प्रसिद्ध चित्रपट 'Tiger जिंदा है' असे कॅप्शन दिले आहे.

पाहा व्हिडिओ:

जर माझ्यावर देवी भगवती कृपा असली तर लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा एकदा जोमाने कामाला लागेल असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. त्यामुळे कृपया विनाकारण माझ्या मरणाच्या अफवा पसरवू नये. तसेच माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करणा-या शुभेच्छुकांना खूप खूप धन्यवाद असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.