माजी मुख्यमंत्री अजित पवार कालपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांत त्यांनी नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यास विशेष भेट दिली आहे. या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. अजित दादांचा विदर्भ दौरा राजकीय दृष्ट्या खास आहे. कारण विदर्भ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं होम ग्राउंड आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदेंकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता पण या दौऱ्यानंतर आणि पूर ओसरल्यानंतर जनतेला नेमक काय मिळालं हे बघण्यासाठी अजित पवारांनी हा दौरा केला असल्याची चर्चा आहे.
तसेच अजित पवारांनी (Ajit Pawar) चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याचीही पहाणी केली आहे. विदर्भातील पूर (Vidarbha Flood) सदृश्य परिस्थिती बघता अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Deputy CM devendra Fadnavis) विदर्भात (Vidarbh) ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. तरी विदर्भातील पूर परिस्थितीवर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. अजित दादांनी खुद्द पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली. (हे ही वाचा:- CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर, करणार 'या' मोठ्या घोषणा)
महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी सह विरोधकांच्या दौऱ्यांचा सपाटा सुरु आहे. नुकताच शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) राज्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यांना भेटी दिल्यात. त्या पाठोपाठ आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काही दिवसांत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील राज्यभर दौरा करणार आहेत. त्यात आता अजित पवारांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्याला विशेष महत्व आहे.