सोन्याची तस्करी (फोटो सौजन्य-ANI)

चेन्नई (Chennai) विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन दक्षिण कोरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर पथकाने विमानतळावर ही मोठी कारवाई केली आहे.

दक्षिण कोरियन आरोपींकडून 24 किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. तर सोन्याच्या बिस्किटांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 8 कोटी रुपये इतकी आहे.

या प्रकरणी सीमाशुल्क विभागाकडून आरोपींनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगतिले आहे. परंतु अद्याप कोणतीही जास्त माहिती देण्यात आलेली नाही.