Air India Urination Case: हवाई प्रवाशांसाठी मर्गदर्श तत्वे लागू करा; एअर इंडियातील पीडित महिला प्रवाशाची सुप्रिम कोर्टाकडे मागणी
Supreme Court

पाठिमागील वर्षी एअर इंडियाच्या (Air India) विमानात न्यूयॉर्क-दिल्ली प्रवासादरम्यान एका मद्यधुंद प्रवाशाने 72 वर्षी महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी (Air India Urination Case) केली. या प्रकरणी देशभर चर्चा झाली. या प्रकरणातील पीडित महिला आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. हवाई प्रवासादरम्यान प्रवाशांना काही मार्गर्शक तत्वे लागू करावीत अशा सूचना डीजीसीए आणि सर्व एअरलाइन्सला देण्यात याव्यात असे या महिलेची मागणी आहे. हेमा राजारामन असे या महिलेचे नाव आहे.

हेमा राजारामन यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे प्रवाशांनी केलेल्या असमर्थनिय वर्तनाबद्दल आणि स्पष्ट शून्य-सहिष्णुता धोरणाचा CAR मध्ये समावेश करावा असे निर्देश द्यावे अशी मागणी केली आहे. ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांना सर्वांना अहवाल देणे बंधनकारक असेल, असे न झाल्यास सर्व विमान कंपन्यांवर कारवाई केली जाईल, अशी हेमा राजारामन यांची मागणी आहे. (हेही वाचा, Air India Urination Case: एअर इंडिया विमानात महिलेवर लंघूशंका केल्याप्रकरणी कंपनीने आरोपी शंकर मिश्राच्या विमान प्रवासावर घातली पुढील 4 महिने बंदी)

प्रकरण काय आहे?

पाठिमागील वर्षी एअर इंडियाच्या विमानात पाठिमागील वर्षी 26 नोव्हेंबर 2022 रोजी फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये एका महिलेवर लघवी केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला 6 जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली होती. आरोपीला नंतर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली होती.