Air India च्या विमानात आता घुमणार 'जयहिंद'चा जयघोष
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

एअर इंडियाच्या (Air India) विमानात आता 'जय हिंद'चा जयघोष घुमणार आहे. विमान प्रवासादरम्यान सर्व कॅबिन क्रु (Cabin Crew) आणि कॉकपिटमधील क्रु (Cockpit Crew) मेंबर्संना 'जय हिंद' (Jai Hind) बोलण्याचा सूचना कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील परिपत्रक एअर इंडियाने जारी केले असून याची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, असा आदेशही देण्यात आला आहे. दिल्ली ते जम्मू-काश्मिर प्रवास फक्त 5000 रुपयात, एअर इंडियाचा निर्णय

परिपत्रकात जारी केलेल्या नव्या नियमानुसार, प्रवासादरम्यान प्रवाशांना उड्डाण आणि इतर सूचना देवून झाल्यानंतर सर्व कॅबिन आणि कॉकपिट क्रु मेंबर्संना 'जयहिंद' बोलणे बंधनकारक असणार आहे.

एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे पुन्हा एकदा अश्वनी लोहानी यांच्या हाती आली असून त्यांनी लगेचच हा नवा नियम लागू केला. यापूर्वी 2016 मध्ये देखील लोहानी यांनी असा आदेश काढला होता.

एअर इंडियामध्ये सध्या 3500 कॅबिन क्रु आणि 1200 कॉकपिट क्रु मेंबर्स आहेत. या सर्वांना नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.