दिल्ली ते जम्मू-काश्मिर प्रवास फक्त 5000 रुपयात, एअर इंडियाचा निर्णय
दिल्ली ते जम्मू-काश्मिर प्रवास फक्त 5000 रुपयात, एअर इंडियाचा निर्णय (Photo Credits-Facebook)

सध्याची भारत आणि पाकिस्तान मधील परिस्थिती पाहता बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. तसेच काही वेळासाठी काल विमानतळ बंद करण्यात आली होती. मात्र या परिस्थितीत आता एअर इंडियाने (Air India) मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्ली (Delhi) ते जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त 5000 रुपये मोजावे लागणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. खासरकरुन दिल्ली ते श्रीनगर, लेह आणि जम्मू विमानतळ पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना तिकिटावर कोणताही अतिरिक्त चार्च लावण्यात आलेला नाही.

यासोबत दिल्ली ते जम्मू-काश्मिर प्रवास करणाऱ्या जवानांसाठी सुद्धा एअर इंडियाने खास सूट उपलब्ध करुन दिली आहे. जर कोणाताही सैनिक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्या पूर्वी प्रवास करत असल्यास त्याला कोणताही अतिरिक्त चार्च भरावा लागणार नाही.(हेही वाचा-Mumbai: Air India च्या कार्यालयात विमान हायजॅक करण्याच्या धमकीचा फोन, देशभरातील साऱ्या विमानतळांवर High Alert जारी)

मात्र काल विमानतळांवर हाय अलर्ट जाहीर केल्याने प्रवाशांना थोडा वेळ विमानतळावर थांबून राहावे लागले होते. त्याचसोबत भारतीय वायुसेनेच्या तणाव परिस्थितीमुळे श्रीनगर,जम्मू,लेह, अमृतसर आणि चंदीगढ मधील विमानतळारील उड्डाणे रद्द करण्यात आली होती.