Sachin Tendulkar, abhinandan Varthman At IAF Day Celebration (Photo Credits: Twitter)

भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) 87व्या वर्धापन दिनाचा सोहळा हिंडन एअर फोर्स स्टेशन (Hindon Air Force Station) गाझियाबाद (Ghaziyabad) येथे पार पडला. यावेळी भारतीय सैन्य (Indian Army), नौदल (Navy) आणि हवाई दलाच्या (Air Force) प्रमुखांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. IAF ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthman) यांची उपस्थिती विशेष ठरली. यांनतर लगेचच चित्तथरारक प्रात्यक्षिके प्रदर्शन करत वायुसेनेतील वैमानिकांनी फायटर जेट्स उडवले.

प्राप्त माहितीनुसार, 87 वर्षांपूर्वी, 8 ऑक्टोबर 1932 साली भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने कमालीची कामगिरी करत देशाच्या राखसनात मोलाचे योगदान दिले आहे. अलीकडेच पार पडलेली बालाकोट एअर स्ट्राईक हे याचे ताजे उदाहरण म्हणता येईल.

ANI ट्विट 

अभिनंदन यांच्या नेतृत्वाखाली एका तुकडीने यावेळी 3 मिरज 2000 एअरक्राफ्ट आणि 2 सुखोई विमाने यांच्यासह आकाशात उड्डाण घेतले होते.

पहा व्हिडीओ

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन सोबत 51 स्क्वाड्रनचा, सोबतच मिंटी अग्रवाल यांच्या युनिट 601 सिग्नल युनिटचादेखील गौरव होणार आहे. 27 फेब्रुवारी 2019 दिवशी पाकिस्तानी हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी एफ-16 हे लढाऊ विमान पाडताना दाखवलेल्या शौर्याचा सन्मान आजच्या कार्यक्रमात करण्यात आला. हा सन्मान कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन सतिश पवार यांनी स्वीकारला होता.