Waris Pathan On Opposition: बंगळुरु येथे नुकत्याच पार पडलेल्या विरोधकांच्या Indian National Democratic Inclusive Alliance (INDIA) वर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयमएमआयएम पक्षाने जोरदार टीका केली आहे. विरोधकांना आमचा पक्ष अस्पृश्य आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निमंत्रीत केले नाही. बाकी सर्वांना बोलावले फक्त आम्हीच त्यांना वर्ज्य आहोत, असे म्हणत या पक्षाने नव्याने स्थापन झालेल्या आघाडीवर टीका केली आहे. एआयमएमआयएम प्रवक्ते वारिस पठाण यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, आम्ही त्यांच्यासाठी राजकीय अस्पृश्य आहोत. आम्ही त्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांना पाहिले. ज्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधकांवर जहरी टीका केली होती, शिव्या दिल्या होत्या. पण आता ते बंगळुरुमध्ये उपस्थित होते. तेथे नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. जे पूर्वी भाजपसोबत होते.
दरम्यान, आम्ही कधीच भाजपसोबत गेलो नाही. त्याऊलट असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव करण्यासाठी एआयमएमआयएम नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. असे असतानाही त्यांनी आम्हाला बोलावले नाही. आम्हीही विरोधी पक्षात आहोत. असे असतानाही त्यांनी आम्हाला बोलावले नाही, असे म्हणत वारीस पठाण यांनी विरोधकांवर टीका केली. (हेही वाचा, INDIA's Next Meeting in Mumbai: विरोधकांची पुढची बैठक मुंबईत, उद्धव ठाकरे यांची बंगळुरु येथे घोषणा)
व्हिडिओ
#WATCH | Mumbai | On the Opposition meeting in Bengaluru, AIMIM National Spokesperson Waris Pathan, says "They did not call us, we are political untouchables for them. There are leaders who were once with BJP including Nitish Kumar, Uddhav Thackeray and Mehbooba Mufti. We saw… pic.twitter.com/zkIMbOjuXd
— ANI (@ANI) July 19, 2023
बंगळुरु येथे देशभरातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. या बैठीकासाठी देशभरातून विविध विचारांचे 26 राजकीय पक्ष उपस्थित होते. या बैठकीत जुन्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नाव बदलून भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी (INDIA) असे करण्यात आले. विरोधकांनी अत्यंत कल्पकतेने हे नाव शोधले आहे. त्यावर देशभरात चर्चा सुरु आहे. दरम्यान, विरोधकांच्या आघाडीत किती पक्ष उपस्थित राहतात, तसेच या सर्वांमध्ये एकमत होते काय? याबाबत उत्सुकता होती. वास्तवात पाटणा येथे झालेल्या बैठकीपेक्षाही अधिक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते या बैठकीस उपस्थित राहिले. तसेच भाजप विरोधावर सर्वांचे एकमतही झाले. आगामी काळात सर्व मतभेद विसरुन एकत्र येण्याबातब या बैठकीत विचारमंथन झाले.