Asaduddin Owaisi On Rajnath Singh: राजनाथ सिंह यांचं भारत-चीन परिस्थितीवरील विधानावर ओवैसीनी केली टिका, म्हणाले - 'ये घिनौना मजाक'
Asaduddin Owaisi On Rajnath Singh (Photo Credits: ANI)

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज भारत-चीन तणावपुर्ण परिस्थिती मध्ये भारत सरकारची भूमिका संसदेत मांडली. मात्र AIMIM प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)  यांनी या भाषणावरुन राजनाथ यांंना टार्गेट करत मी आजवर इतके कमजोर आणि अपुरे विधान कधीही ऐकलेले नाही म्हणत टीका केली आहे. राजनाथ सिंंह यांंनी देशाला दिलेले उत्तर हा देशवासियांंसोबतचा घिनौना मजाक आहे असं सुद्धा ओवेसी यांंनी म्हंंटलेलंं आहे. मला सदनात बोलण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. जर ती मिळाली असती तर मी माझी भूमिका नक्की मांडली असती असे म्हणत ओवेसी यांंनी काही वेळापुर्वी ट्विट केले आहे.

अन्य एका ट्विट मध्ये ओवेसी म्हणतात की, हे सरकार इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात तरबेज आहे. आज राजनाथ सिंह यांनी असं वक्तव्य केलं की आपण सगळ्यांनी आपल्या सुरक्षा दलांसोबत असलं पाहिजे. संसदेचा प्रत्येक सदस्य सुरक्षा दलांसोबत आहेच याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही पण या सगळ्यात सरकार कुठेय तुम्ही या तणावपुर्ण परिस्थितीत सगळा भार जवानांंवर टाकत आहात अशी टीका सुद्धा ओवेसी यांंनी केली आहे.

असदुद्दीन ओवेसी ट्विट

भारत चीन तणावासंदर्भात माहिती सरकारकडुनच नागरिकांंपर्यंत का पोहचत नाहीये, माध्यमांना सुद्धा या माहितीसाठी त्यांंच्या गुप्तहेरांंवर का अवलंबुन राहावे लागतेय. लडाखमध्ये 20 जवानांना कसा जीव गमवावा लागला हे सरकारला विचारण्याचा आमचा अधिकार आहे. या विषयावर चर्चा व्हायला हवी असेही मत ओवेसी यांंनी ट्विटमधुन मांंडले आहेत.

दरम्यान, आज राजनाथ सिंंह यांंनी संंसदेत भाषण देताना, भारत आणि चीन दोघांनी शांंततेने ही परिस्थिती सोडवण्याचे मान्य केले आहे. यासाठी संयमाची गरज आहे. सीमा प्रश्नी तोडगा निघेपर्यंत LAC चा आदर ठेवायचा आहे तरीही लडाख सीमेवर शूर सैनिकांनी जिथे संयम ठेवणे आवश्यक होते, तिथे संयम दाखवला व जिथे शौर्यची आवश्यकता होती, तिथे शौर्य दाखवले असे सांंगितले होते.