Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

AI चे जसे फायदे आहेत तसेच आता या तंत्रज्ञानाचा वापर फसवणूकीसाठी देखील होत असल्यचा प्रकार समोर आला आहे. लखनऊ मध्ये AI चा वापर करून वॉईस फ्रॉड केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक करणार्‍याने 25 वर्षीय कार्तिकेयला 44,500 रूपये अकाऊंट मध्ये ट्रांसफर करण्याच्या बहाण्याने त्याच्या दुरच्या काकाचा वॉईस AI द्वारा बनवत त्याची फसवणूक केली आहे. सायबर एक्सपर्ट्स नुसार ही पहिलीच एआय जनरेटेड वॉईस फ्रॉड केस आहे.

एआय जनरेटेड वॉईस फ्रॉड केस मध्ये फसवणूक करणारी व्यक्ती अत्यंत खुबीने आवाजाची हुबेहुब नक्कल करते. ज्यामध्ये तत्काळ आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगून, एक दुःखदायक कथा रचते आणि पीडित व्यक्ती बळी पडते. कार्तिकेय सोबत देखील असाच प्रकार झाला. त्याच्या दुरच्या नातेवाईकाच्या आवाजाची नक्कल करण्यात आली. त्याने आपल्या अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचं आवाहन केले. कार्तिकेयला हा आवाज नक्कल असेल असा संशयही आला नसल्याचं म्हणाला. असे TOI च्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.

कार्तिकेय ला आर्थिक व्यवहारासाठी 5 मेसेज पाठवण्यात आले होते. यामध्ये 90 हजारांच्या व्यवहाराची विनंती करण्यात आली होती. तो आपण UPI करू शकत नसल्याचं सांगत त्याने यूपीआय मधून पैसे पाठवावेत असं सांगितलं. मग कार्तिकेयने देखील त्या फसवणूक करणार्‍या व्यक्तीने दिलेल्या क्रमाकांवर 90 हजारांचा व्यवहार केला. काही ट्रान्झॅक्शन ही अयशस्वी ठरली. त्यामुळे केवळ 44500 चं नुकसान झालं. सध्या या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. नक्की वाचा:  Mumbai News: पैशांचं आमिष दाखवून पोलिस मित्राची केली फसवणूक, 36 लाखांचा लावला गंडा .

सायबर एक्सपर्ट आणि माजी SP Cyber cell, Triveni Singh यांनी TOI शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, AI voice scam हा असा एक फ्रॉड आहे ज्यामध्ये artificial intelligence चा वापर करून आवाजाची नक्कल केली जाऊ शकते. अनेकदा याद्वारा कुटुंब, मित्रपरिवार, कस्टामर सर्व्हिसचे प्रतिनिधी यांच्यानावे फसवणूक केली जाऊ शकते.ö