Ahmed Patel | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज निधन (Ahmed Patel Passes Away) झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात दु:ख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ( Sonia Gandhi), राहुल गांधी, (Rahul Gandhi), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह देशभरातील काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्य आहेत. अहमद पटेल यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे गेले महिनाभराहून अधिक काळ ते गुरुग्राम येथील मेदंता रुग्णालय येथे उपचार घेत होते. शरीरातील अवयवांनी काम करणे थांबवल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 71 वर्षांचे होते. अहमद पटेल याचे चिरंजीव फैसल पटेल यांनी ट्विटरद्वारे वडिलांच्या निधनाबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली.

उत्तम गूण आणि नेतृत्व यांचा उत्कृष्ठ मिलाप- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे की, अहमद पटेल हे एक उत्तम खासदार होते. उत्तम गूण आणि नेतृत्व यांचा उत्कृष्ठ मिलाप पटेल यांच्या व्यक्तीमत्वात होता. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले आहे.

चांगला मित्र, सहकारी आणि कार्यकर्ता गमावला- सोनिया गांधी

अहमत पटेल यांच्या रुपाने एक चांगला मित्र, सहकारी आणि कार्यकर्ता पक्षाने गमावला अशी भावना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी जनसेवेसाठी आयुष्य वेचले- पंतप्रधान मोदी

अहमद पटेल हे एक तल्लख बुद्धीचे नेते होते. काँग्रेस पक्षाला एक शक्तीशाली पक्ष म्हणून उभा करण्यात पटेल यांचा मोठा वाटा होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी वेचले. काँग्रेस पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान कायमच लक्षात ठेवले जाईल. अहमद पटेल यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

ते काँग्रेससोबत एका मौल्यवान संपत्तीसारखे उभे राहिले- राहुल गांधी

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षासाठी एक स्तंभ होते. खडतर काळातही त्यांनी पक्षासोबत काम केले. अहमद पटेल यांची उणीव आम्हाला सतत जाणवत राहिल. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षावरच शोककळा आली आहे. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काँग्रेस आणि गांधी कुटुंबास अत्यंत गरज असतानाच ते गेले- संजय राऊत

अहमद पटेल गेले. काँग्रेस आणि गांधी कुटुंबास अत्यंत गरज असतानाच ते गेले. पक्ष निष्ठेची पाठशाळा म्हणजे अहमद पटेल. काँग्रेसचा एक मजबूत स्तंभ कोसळून पडला. एक विनम्र नेत्यास माझी विनम्र श्रध्दांजली. अहमद भाई आपने ये क्या किया?, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काँग्रेसने अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक, रणनितीकार गमावले- बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःख असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षातील एक महत्त्वाचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते प्रदीर्घ काळ सल्लागार राहिले. काँग्रेस हा एक देशातील सर्वात जुना पक्ष आहे. अशा पक्षाला सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण काम पटेल गेली अनेक वर्षे करत आले आहेत. गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या आणि अत्यंत संवेदनशील गोष्टींची माहिती असणाऱ्यांपैकी एक नेते अशी त्यांची ओळख होती. सांगितले जाते की, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या निधनानंतर अहमद पटेल यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच सोनिया गाधी भारतीय राजकारणा आणि प्रामुख्याने काँग्रेसमध्ये स्थिरस्थावर झाल्या. काँग्रेस पक्षातील तत्कालीन नेते पी.व्ही. नरसिंह राव यांच्याशी मतभेद होऊनही सोनिया गांधी यांचे काँग्रेसमधील स्थान बळकट राहिले. राहुल गांधी हे सुदधा अनेकदा अहमद पटेल यांचाच सल्ला घेतात असे सांगितले जायचे. (हेही वाचा, Ahmed Patel Passes Away: जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन, कोरोना व्हायरस संसर्गामुळे वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

अहमद पटेल यांनी महानगरपालिका निवडणुकांपासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. पुढे ते पंचायत समिती सभापती बनले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला आणि ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लावण्यात आलेल्या 1977 च्या आणिबाणीनंतर काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. परंतू, त्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसाल मोठा विजय मिळाला. या विजयात अहमद पटेल लोकसभेवर पहिल्यांदा निवडूण गले. तेव्हापासून ते 1977, 1980,1984 असे तीन वेळा लोकसभेवर निवडूण आले. ते तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभा खासदार राहिले आहेत. 1993,1999, 2005, 2011, 2017 पासून आजतागायत ते राज्यसभेवर काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.