Indian Marriage | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

अनेकवेळा वय निघून गेलं असताना कागदोपत्री वय कमी केलं जातं आणि लग्न ठरवलं जातं. गुजरातमध्ये अशाच एका प्रकरणात पतीने चक्क पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला. पत्नी  गरोदर राहत नसल्याने चाचणी केल्यानंतर सोनाग्राफी रिपोर्टमधून पत्नीचे वय समोर आले. पत्नी ही पतीपेक्षा तब्बल आठ वर्षांनी मोठी असल्याचं समोर आलं. पतीने या प्रकरणी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयावर गुन्हा दाखल केला आहे.  हे विचित्र प्रकरण गुजरातमधील अहमदाबादमध्ये उघडकीस आलं आहे. (हेही वाचा - Ghaziabad: बनावट IAS दाखवून महिलेने अनेकांची केली फसवणूक, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील घटना - व्हिडिओ)

अहमदाबादच्या सरखेज भागात राहणाऱ्या एका महिलेला वर्षभरापासून गर्भधारणा होऊ शकली नाही. तेव्हा तिचा 34 वर्षीय पती तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यावेळी केलेल्या वैद्यकीय अहवालात ती महिला 40 वर्षांची असल्याचे समोर आलं. सोनोग्राफी अहवालातील खुलासा झाल्यानंतर पतीला धक्काच बसला. लग्नाच्या वेळी पत्नीचे वय 32 वर्षे असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र सोनोग्राफीमध्ये तिचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. पतीने अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल करून पत्नीचे वय लपविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेतील पती पत्नी असलेल्या जोडप्याची मे 2023 मध्ये एकमेकांशी ओळख झाली होती. लग्नासाठी देण्यात आलेल्या बायोडेटामध्ये त्या मुलीचं वय हे 18 मे 1991 असं नमूद होतं. त्यामुळे तिचं वय हे मुलापेक्षा 18 महिन्यांनी लहान असल्याचं दाखवण्यात आलं. पण मुलाकडच्या लोकांनी वारंवार मागणी करूनही मुलीच्या बाजूच्यांनी तिचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर शैक्षणिक पुरावे दिले नसल्याचे मुलाच्या घरच्यांनी सांगितले आहे.