लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी साधारणपणे तिकीट बुकींग केलं जातं. मात्र अनेकदा तिकीट बुकिंग न मिळाल्याने प्रवासादरम्यान नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. तर कधी जनरल डब्यातून प्रवास करावा लागतो. मात्र प्रवाशांना होणारा हा त्रास आता कमी होणार आहे. कारण आता विनाआरक्षित डब्यात बायोमॅट्रीक बसवण्यात येणार आहे. 'भारतीय रेल्वे'चं महिला प्रवाशांसाठी खास गिफ्ट; आता सुंदर पेंटिंग असलेल्या डब्यातून करा प्रवास (पहा व्हिडिओ)
बायोमॅट्रीक तंत्रज्ञानामुळे रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रवाशांचा प्रवास उत्तम होण्यासही मदत होईल म्हणून हे पाऊल उचलले असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. (आता चालत्या ट्रेनमध्येही घ्या 'शॉपिंग'चा आनंद; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे खास ट्विट)
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी देखील झाला. त्यामुळे आता हा प्रयोग इतर ट्रेन्समध्येही करण्यात येणार आहे. तसंच काही ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बायोमॅट्रीक सुविधा लागू करण्यात येणार आहे.('मध्य रेल्वे' बनवणार 'रियल टाइम मोबाइल अॅप', प्रवाशांना कळणार लोकलची अचूक वेळ)
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बायोमॅट्रिक मशिनमधून जावे लागणार आहे. या मशिनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जाईल आणि त्याद्वारे सीट बुक होणार आहे. ट्रेन आल्यानंतर बोटाचे ठसे तपासून आपल्या जागी बसून प्रवास करा. विशेष म्हणजे डब्याची क्षमता असेल तितकेच फिंगर प्रिंट मशीन घेणार आहे. त्यामुळे प्रवासात सीटवरुन होणारी भांडणे, वादावादी, मारामारी या सर्व गोष्टी टाळता येतील.