आता चालत्या ट्रेनमध्येही घ्या 'शॉपिंग'चा आनंद; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे खास ट्विट
Representational Image (Photo Credits: Youtube/Screengrab)

रेल्वेने लांब पल्ल्याचा करताना आपण मोबाईलवर व्हिडिओज, सिनेमे पाहणे, पुस्तक वाचणे यात वेळ घालवतो. मात्र रेल्वे प्रशासन आता या व्यतिरिक्तही एक विरंगुळा प्रवाशांसाठी उपलब्ध करत आहे. हा एक विरंगुळा नसून सेवा-सुविधा आहे. लवकरच रेल्वे प्रशासन लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये शॉपिंगची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. यासंदर्भातील माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी ट्विट करुन दिली. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये आता शॉपिंगची सुविधा

एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले की, "बदलत्या काळातील बदलत्या रेल्वे ट्रेन्स. प्रवाशांना आता विमानात ज्याप्रमाणे शॉपिंग करता येते तशी सुविधा रेल्वेत मिळणार आहे. यासाठी ट्रेन्समध्ये शॉपिंग कार्टसह सेल्समॅनही असतील. त्यांच्याकडून प्रवासी शॉपिंग करु शकतात. त्याचबरोबर रोख, क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही खरेदी करु शकता."

सुरुवातील पश्चिम रेल्वेच्या 16 मेल्स आणि एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू पाहण्यासाठी प्रवाशांना कॅटलॉग देण्यात येतील. या सुविधेला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार, इतर एक्स्प्रेसमध्ये शॉपिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.