Amit Shah| Photo Credits: Twitter /ANI

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री भारतवासियांशी संवाद साधताना कोरोना व्हायरस संकटाशी सामना करताना आता आपल्याला 'आत्मनिर्भर' होण्याची गरज असल्याचं सांगत लोकल बाबत व्होकल व्हा! असा संदेश दिला आहे. आता स्वदेशी उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता 1 जूनपासून सर्व केंद्रीय सशस्त्र  पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री केली जाईल असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निर्णयामुळे देशात असलेल्या 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलामध्ये असणारी 50 लाख कुटुंब 2800 कोटी किंमतीची देशी उत्पादन असलेली वस्तूंची खरेदी करू शकणार आहेत. COVID19, रमजान ईद या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र्र पोलिसांवर तणाव वाढण्याची शक्यता, मदतीसाठी CAPF च्या 20 टीम राज्यात रुजू कराव्यात- अनिल देखमुख

गृहमंत्री अमित शहा यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती देताना आपण देशातील बनवलेल्या उत्पादनांचा अधिकाधिक वापर करूया आणि इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करूया असे आवाहन देखील केले आहे. प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यास आपण येत्या पाच वर्षांत आपली लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते. असा दावा केला आहे.

अमित शाह यांचं ट्वीट

भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नरेंद्र मोदींनी काल पंचसूत्री देखील सांगितली आहे. दरम्यान कोरोनाच्या संकटात सामान्य, गोर गरिब यांचे हाल होऊ नयेत म्हणून भारत सरकारने 20 लाख कोटींची तरतूद केली आहे. थोड्याच वेळात याबाबत अर्थ मंत्रालयाकडून अधिकृत माहिती आणि तपशील दिले जाणार आहेत.