कांद्याच्या दर वाढीनंतर तूर डाळीच्या किंमती शंभरी गाठण्याची शक्यता
तूर डाळ भाववाढ ( फोटो सौजन्य - फाइल इमेज )

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. यामुळे सामान्यांच्या शिखाला चांगलीच कात्री बसली आहे. तर दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे कांद्याचे दर 100 ते 120 रुपयांवर पोहचले आहेत. व्यापाऱ्यांचे असे म्हटले की, बाजारात कांद्याची आयात कमी झाली असल्याने किंमती वाढल्या आहेत. दिल्लीत तूर डाळीचे दर 98 प्रति किलो झाली आहे. यामुळे तूर डाळीची आयात 4 लाख टन कोटा ठेवण्यात आला आहे. खरंतर सरकारने व्यापाऱ्यांना असे सांगितले आहे की, विदेशातून खरेदी केलेली तूर डाळ भारतात आणण्याचे निर्देशन दिले आहेत.

तूर डाळीच्या किंमती वाढ चालल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत चालले आहे. तसेच तूर डाळीची पूरेशी साठवणूक न झाल्याने 4 लाखापर्यंतचा आयात कोटा असावा असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात दुष्काळाने आणि काही भागातील अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसलाय. त्यामुळे धान्य आणि कडधान्यांचे उत्पादन देखील कमी झाले आहे. जुलै महिन्यात तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो आठ रुपये वाढ झाली असून 100 रुपये दर झाले होते. 2015  मध्ये दुष्काळ पडल्याने तुरीचे उत्पन्न घटले होते. त्यावर्षी तुरडाळीचे दर गगनाला भिडले होते. प्रतिकिलो 220 रुपयांनी तूरडाळीची विक्री झाली. गरीबांसाठी सरकारला रेशनवर प्रतिकिलो 100 रुपयांने तूरडाळ विक्री करावी लागली. त्यावेळी केंद्र सरकारने डाळीचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. (जर तुमच्या घरी उशिराने LPG आल्यास तक्रार करा, विक्रेत्याचे कापले जाणार कमिशन)

तसेच कांद्याचे दर वाढल्याने त्याची आयात सुद्धा कमी झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर 60 ते 80 रुपये प्रति किलो असून किरकोळ बाजारात त्याचे दर 90 ते 120 रुपये किलो आहेत. तर कांद्याचे वाढलेले दर पाहता याचा परिणाम मुंबईतील हॉटेलमध्ये सुद्धा झाला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये कांद्यासाठी अधिक 20 रुपये स्विकारले जात आहेत.