इथोपियन दुर्घटनेनंतर बोईंग 737 मॅक्स विमानांच्या उड्डाणावर भारतासह 10 देशांत बंदी
File image of Boeing 737 MAX aircraft used for representational purpose | (Photo Credits: Getty Images)

इथोपियन एअरलाईन्सच्या (Ethiopia Airlines) बोईंग 737 मॅक्स 800 विमानाच्या दुर्घटनेनंतर जगभरात या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. बोइंग 737 मॅक्स-8 विमान दुर्घटनेत तब्बल 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यात चार भारतीय नागरिकांचाही समावेश होता. त्यानंतर या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. यात एकूण 10 देशांचा समावेश आहे. भारताने देखील या विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली असून स्पाईस जेट, जेट एअरवेज या एअर लाईन्सकडे असलेल्या बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. Ethiopian Airlines चं ET 302 कोसळलं, मृत 157 प्रवाशांमध्ये चार भारतीयांचा समावेश

भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझिल, चीन, सिंगापूर या देशांनी बोईंग विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. मात्र अमेरिकेने अद्याप बोईंग विमानांच्या उड्डाणावर प्रतिबंध केलेला नाही. पण या विमानांत सुधारणा करण्याचे आदेश अमेरिकेच्या विमान वाहतुक विभागाने दिले आहेत.

बोईंग विमान उड्डाणांवर बंदी हा निर्णय सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. बोईंग विमान उड्डाणासाठी सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत विमानांचे उड्डाण करु नये, असे नागरी विमान महासंचलनालयाने (डीजीसीए) सांगितले आहे.