IAF Wing Commander Abhinandan Varthaman (Photo Credits: IANS)

बालकोट (Balkot) एअर स्ट्राईकमध्ये (Air Strike) पाकिस्तानचे F-16 पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांची आता सूरतगड (Suratgarh) येथील एअर फोर्स तळावर पोस्टिंग करण्यात आली आहे. शनिवार पासून अभिनंदन हे या नव्या तळावर रुजू झाले असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

अभिनंद यापूर्वी सुद्धा राजस्थान मध्ये होते. तसेच बिकानेर येथील तळावर सुद्धा ते कार्यरत होते. त्याचसोबत त्यांचे आई-वडिल हे हवाई दलात असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र हवाई दलातील वैमानिकांची माहिती गोपनीय असते. त्यामुळे त्यांची पोस्टिंग राजस्थान येथे करण्यात आली असल्याचे सांगू शकतो असे हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तर सूरतगड येथे मिग-21 बायसनचे तळ आहे.(अभिनंदन वर्धमान यांच्या नावे फेक अकाऊंट्समध्ये वाढ; विंग कमांडर सोशल मीडियावर नसल्याचा वायुसेनेकडून खुलासा)

तर काही दिवसांपूर्वीच अभिनंदन यांचे काश्मीर येथील तळावर आनंदात स्वागत करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात झळकला होता. तसेच पाकिस्तान मधून परतल्यावर पहिल्यांदाच त्यांची ही पहिली पोस्टिंग करण्यात आली आहे.