IAF Wing Commander Abhinandan Varthaman (Photo Credits: IANS)

पाकिस्तानच्या (Pakistan) ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेचे (Indian Air Force) विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (IAF Wing Commander Abhinandan Varthaman) यांची तब्बल 60 तासांनंतर सुखरुप सुटका झाली. त्यांच्या सुटकेनंतर अभिनंदन यांच्या शौर्याला सर्वच स्तरातून सलाम केला जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. याच दरम्यान गेल्या आठवड्याभरात सोशल मीडियावर अभिनंदन वर्धमान यांच्या नावाने अनेक अकाऊंड्स बनत आहेत आणि त्यात वाढ होत आहे. मात्र विंग कमांडर अभिनंदन यांचे ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) यांसारख्या सोशल मीडिया साईट्सवर अकाऊंट नसल्याचे वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अभिनंदन यांच्या नावे सोशल मीडियावर असणारी अकाऊंट्स फेक असल्याचे वायुसेनेकडून सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनंदन भारतात परतल्यानंतर त्यांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट्स बनवण्यात आले. यापैकी 6 फेक अकाऊंट्सची (Fake Accounts On Social Media) ओळखण्यात आले आहेत. मात्र या फेक अकाऊंट्समुळे कोणाचेही नुकसान होऊ नये आणि चुकीची माहिती पसरवली जावू नये म्हणून या सोशल मीडियावरील अकाऊंसला फॉलो न करण्याचे आवाहन वायुसेनेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे अभिनंदन यांच्या नावे कोणतेही अकाऊंट दिसले तरी फॉलो करु नका किंवा पूर्वीपासून फॉलो करत असाल तर अनफॉलो करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे आहे.

अलिकडेच उत्तर प्रदेश पोलिसांनी फेक अकाऊंट बनवण्याच्या आरोपाखाली एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती अभिनंदन यांच्या नावे फेक अकाऊंट बनवून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्तुती करत होता. अभिनंदन यांच्या नावे असलेल्या फेक अकाऊंट्सबद्दल सरकार, वायुसेनेकडून वारंवार स्पष्टीकरण देवूनही अजूनही फेक अकाऊंट्सचे प्रकरण पूर्णपणे नियंत्रणात आलेले नाही. आता शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे धडे

14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. यात दहशतवाद्यांची स्थळं उद्धवस्त करण्यात आली. मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारतात घुसखोरी केली. याचे प्रतित्तुर देताना पाकिस्तानाचे F-16 हे विमान पाडण्यात भारताला यश आले. मात्र भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडण्यात पाकिस्तानला यश आले.