Aastha Special Trains: अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर भारतीय रेल्वे चालवणार 200 आस्था स्पेशल ट्रेन; जाणून घ्या मार्ग आणि इतर तपशील
Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाचा अभिषेक होणार असून, त्याबद्दल संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. 22 जानेवारपासूनच नव्याने बांधलेले राम मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. अशात जास्तीत जास्त लोकांना राम मंदिराचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे 200 हून अधिक खास ट्रेन चालवणार आहे. या गाड्यांना ‘आस्था स्पेशल ट्रेन’ (Aastha Special Trains) म्हटले जात आहे. देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी रेल्वेकडून आस्था स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

या गाड्यांचे बुकिंग फक्त आयआरसीटीसी (IRCTC) मार्फतच केले जाईल, असे रेल्वेच्या परिपत्रकात म्हटले आहे. आयआरसीटीसीकडून ट्रेनमध्ये शाकाहारी जेवण दिले जाईल. या ट्रेनमध्ये प्रवास करताना आरक्षण, सुपर फास्ट फी, केटरिंग फी, सर्व्हिस फी आणि जीएसटी सारखे शुल्क लागू होईल.

आस्था स्पेशल ट्रेन खालील राज्यांमधून धावणार आहेत-

दिल्ली -

नवी दिल्ली स्टेशन - अयोध्या - नवी दिल्ली स्टेशन

आनंद विहार - अयोध्या - आनंद विहार

निजामुद्दीन - अयोध्या - निजामुद्दीन

जुने दिल्ली रेल्वे स्टेशन - अयोध्या धाम - जुने दिल्ली रेल्वे स्टेशन

महाराष्ट्र-

मुंबई - अयोध्या - मुंबई

नागपूर - अयोध्या - नागपूर

पुणे - अयोध्या - पुणे

वर्धा - अयोध्या - वर्धा

जालना - अयोध्या - जालना

गोवा-

1 आस्था विशेष

तेलंगणा-

सिकंदराबाद - अयोध्या - सिकंदराबाद

काजीपेठ जं. - अयोध्या - काजीपेठ जं

तामिळनाडू-

चेन्नई - अयोध्या - चेन्नई

कोईम्बतूर - अयोध्या - कोईम्बतूर

मदुराई - अयोध्या - मदुराई

सालेम - अयोध्या - सालेम

जम्मू-काश्मीर-

जम्मू - अयोध्या - जम्मू

कटरा - अयोध्या - कटरा

गुजरात-

उधना - अयोध्या - उधना

वापी - अयोध्या - वापी

वडोदरा - अयोध्या - वडोदरा

वलसाड - अयोध्या - वलसाड

मध्य प्रदेश-

इंदूर - अयोध्या - इंदूर

बिना – अयोध्या – बीना

भोपाळ – अयोध्या – भोपाळ

जबलपूर – अयोध्या - जबलपूर (हेही वाचा: Judicial Holiday For Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील न्यायालये राहणार बंद? बार कौन्सिलने सरन्यायाधीश चंद्रचूड यांना लिहिले पत्र)

दरम्यान, अयोध्येत 22 जानेवारीला श्री राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने आस्था स्पेशल ट्रेन सुरू केली आहे. ही ट्रेन देशातील 66 ठिकाणांवरून चालणार आहे. 22 डबे असलेली ही ट्रेन देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या सेवेत आणली जाईल. ट्रेनच्या मागणीनुसार आणखी ठिकाणेही यामध्ये जोडली जातील.