तुमच्या 5 वर्षाच्या मुलाचे Aadhaar Card काढायचे आहे? तर 'या' कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार
Aadhar Card (Photo Credits: PTI)

सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे. कारण आधार कार्डच्या द्वारे तुम्ही भारताचे नागरिक असल्याचे दर्शवते. खरंतर आधार कार्ड बहुतांश वेळा सरकारी कामकाजांवेळी उपयोगी पडते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या 5 वर्षाच्या मुलाचे आधार कार्ड बनवायचे असेल तर काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. यासाठी आधार कार्ड रजिस्ट्रेशन सेंटर येथे जाऊन त्याच्या मुलाच्या नावाचा फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच मुलाचा जन्मदाखला आणि पालकाचे आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. मात्र लक्षात असू द्या आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला मुलाला सुद्धा सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. सद्य परिस्थितीत 22 कोटी पॅन कार्ड आधार कार्डशी संलग्न केलेले आहेत. तर 120 कोटी लोकांकडे आधार कार्ड आहेत. त्यामुळे पॅन कार्ड बनवायचे असल्यास आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड असल्यावर पॅन कार्ड तयार करता येते.

पाच वर्षाखालील मुलाच्या आधार कार्डसाठी त्याचे बयोमेट्रिक न घेता पालकांचे आधार कार्ड जोडले जाते. मुल 5 वर्षाचे झाल्यास त्याचा फोटो, हाताचे फिंगरप्रिंट, रेटिना स्कॅन आधार केंद्रात केले जाते. तर जाणून घ्या मुलाचे आधार कार्ड काढण्यासाठी 'ही' कागदपत्र दाखवणे गरजेचे आहे.(Budget 2019: आता इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधारकार्ड ही धरले जाणार ग्राह्य)

-आधार कार्डसाठी नामांकन केंद्राच्या येथे जाऊन फॉर्म भरावा.

-जर तुमच्याकडे मुलाचे वैध पत्ता नसल्यास तर पालकाचे आधार क्रमांक डिटेल द्या.

-मुलाचे बायोमॅट्रिक्स, रेटिना स्कॅन यांसारख्या गोष्टींची आवश्यकत आहे.

-ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक रिसिप्ट देण्यात येईल.

-90 दिवसांच्या आधी तुमचे आधार कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

तर बँकेत 50 हजारांहून अधिक रक्कमचे व्यवहार करायचे असल्यास पॅन कार्ड नंबरची आवश्यकता असते. तसंच आपले पॅन कार्ड चेक करुनच बँकेकडून असे व्यवहार केले जातात. मात्र आता पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डच्या माध्यमातून 50 हजारांहून अधिक रक्कमचे व्यवहार करणे शक्य होणार असल्याची माहिती महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी दिली होती.