Aadhar Card (Photo Credits: PTI)

यंदाच्या बजेट मध्ये भारतीय चलनापासून आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये बरेच महत्त्वाचे आणि आमूलाग्र बदल करण्यात आले. त्यात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे आता इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर आधारकार्डही ग्राह्य धरले जाणार आहे. या निर्णयामुळे पॅन कार्ड नसलेल्या लोकांना इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अडचण येत होती, त्यांच्यासाठी ही खूपच दिलासादायक अशी बातमी आहे.

सर्वेक्षणानुसार, 120 करोड पेक्षा जास्त भारतीयांकडे आधारकार्ड आहे. त्यामुळे आपण पॅनकार्ड आणि आधारकार्ड यांची अदलाबदल केली असून आता ज्यांच्याकडे पॅनकार्ड नसेल ते आधारकार्डच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करु शकतात, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

अलीकडेच इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करण्यासाठी आता आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक गरजेचे असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.