कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीचा प्रसार थांबविण्यासाठी गुजरात (Gujarat) मधील संपूर्ण राज्य प्रशासन एकत्र आले आहे. याबाबत सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सतत चर्चा होत आहे. मात्र गुरुवारी रात्री कोरोना संदर्भात कॉर्डिनेशनसाठी तयार करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या, Whatsapp Group च्या सदस्यांसमोर एक विचित्र परिस्थिती उद्भवली. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एका सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याने (Retired IAS Official) एका महिला आयएएस अधिकाऱ्यासह आपला नग्न फोटो (Nude Photo) पोस्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सध्या सरकारमध्ये अत्यंत संवेदनशील पदावर कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री त्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर नग्न फोटो आणि काही अन्य आक्षेपार्ह कंटेंट पोस्ट केला.
असे फोटो पाहून खचितच इतर लोकांना धक्का बसला, त्यानंतर या अधिकाऱ्यांना हे फोटो काढून टाकण्यास सांगण्यात आले. मात्र व्हाट्सएपच्या सदस्यांमध्ये बराच वेळ या आक्षेपार्ह पोस्टवर चर्चा सुरू होती. शुक्रवारी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचली, परंतु सीएमओने अद्याप या प्रकरणात कोणतीही कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला नाही. ग्रुपमधील सदस्यांनी सांगितले की, असले फोटो पाहिल्यानंतर त्यांची लाजिरवाणी परिस्थिती झाली होती. इतर अधिकाऱ्यांनी हे फोटो डिलीट करण्यास सांगितले मात्र संबंधित अधिकाऱ्याने ते ग्रुपमधून काढले नाहीत. अखेर त्यांना फोन करून हे ‘असले’ फोटो ग्रुपमधून डिलीट करा असे सांगितले, त्यानंतर त्यांनी ते फोटो डिलीट केले.
(हेही वाचा: राहुल गांधी यांनी घेतली परप्रांतीय कामगारांची भेट; फुटपाथवर बसून केली आत्मीयतेने विचारपूस (Photo))
हा ग्रुप फक्त कामाची माहिती शेअर करण्यासाठी आहे, इथे कोणीही वैयक्तिक कंटेंट पोस्ट करू शकत नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हे फोटो ग्रुपमध्ये चुकून शेअर झाल्याचे सांगितले. राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, सध्या गुजरातमधील केडरचे काही वरिष्ठ आयएएस अधिकारी दिल्लीत महत्त्वाच्या पदांवर तैनात आहेत आणि ते या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्यही आहेत. सेवानिवृत्त मुख्य सचिव, दिल्लीत तैनात काही अधिकारी आणि इतर काही आयएएस अधिकाऱ्यांनी या आक्षेपार्ह फोटोबद्दल अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले.