Conspiracy to derail a train प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सोज्य - @JharkhandRail)

Uttarakhand: उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये डेहराडून एक्स्प्रेस (Dehradun Express) रुळावरून उतरवण्याचा कट फसला आहे. उत्तराखंडमधील डोईवाला-हररावला (Doiwala-Harrawala) दरम्यान रेल्वे ट्रॅक (Railway Track) वर अज्ञात व्यक्तीने 15 फूट लांबीची लोखंडी सळई ठेवली. त्यामुळे गाडी तिथून पुढे गेल्यावर मोठा आवाज झाला. त्यामुळे लोको पायलटला ट्रेन थांबवावी लागली. यानंतर, लोखंडी सळई काढल्यानंतर ट्रेन पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली.

दरम्यान, लोको पायलटच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोतवालीचे प्रभारी निरीक्षक विनोद गुसाई यांनी सांगितले की, पहाटे साडेचार वाजता डेहराडूनला पोहोचलेल्या काठगोदाम एक्स्प्रेसचे लोको पायलट अनुज गर्ग यांनी कोतवाली येथे यासंदर्भात तक्रार दाखल केली. (हेही वाचा - Goods Train Derailed in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत (Watch Video))

डेहराडून एक्सप्रेस रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न - 

यापूर्वी देखील अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरून उतवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रेल्वे रुळावरून खाली उतरवण्याचे हे पहिलेचं प्रकरण नाही. या अगोदरही काही समाजकंटकांनी रुद्रपूर स्थानकापासून दूर उत्तर प्रदेश हद्दीत असलेल्या बिलासपूर भागातील रेल्वे ट्रॅकवर लोखंडी खांब टाकले होते. याशिवाय देशातील विविध राज्यांतूनही अशा घटना समोर येत आहेत.