UP Building Collapse : उत्तर प्रदेशातील मेरठ भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे एक निवासी इमारत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मेरठ विभागाच्या आयुक्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 8 ते 10 लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- घाटकोपर येथील निवासी इमारतीला आग, 13 जण जखमी, रुग्णालायत उपचार सुरु)
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ येथील झाकिर कॉलनीत एक निवासी इमारत कोसळली, या घटनेत ८ ते १० लोक ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी यंत्रसामग्री दाखल झाली असून दिवे लावण्यात आले आहेत. पोलीस आणि अग्निशमन अधिकारी बचावकार्य करत आहेत. लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला माहिती देण्यात आली आहे की, बचाव कार्य वेगात केले जात आहे.
मेरठ येथील बचावकार्य सुरु
VIDEO | Meerut building collapse: Rescue operations continue after a three-storey house in Meerut’s Zakir Colony collapsed earlier today, killing three people.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/Cdoq0yoWC2
— Press Trust of India (@PTI_News) September 14, 2024
उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत रक्कम देण्यात आली आहे. आता पर्यंत ३० जणांच्या नुकसानी संदर्भात मदत रक्कम देण्यात आली आहे. पूरामुळे 3,056 घरांचे नुकसान झाले आहे.