Bank Unions Strike: बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी संघटनांकडून दोन दिवसांच्या संपाची हाक; 9 फेब्रुवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Feb 09, 2021 11:58 PM IST
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकळा तुटल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अद्यापही 170 जण बेपत्ता असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आयटीबीपी तसेच इतर बचाव कार्य संस्था या बेपत्ता लोकांचा तपास करत आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोकण दौऱ्यावर असताना शिवसेनेवर टीका केली होती. आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसतं, असं अमित शहा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांचे जिवंतपणीच श्राद्धे घातलं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा फटना सर्वसामान्यांना बसत आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. आज नवी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 35 पैशांची वाढ झाली असून मुंबईत पेट्रोलचे दर 34 पैशांनी वाढले आहेत.