दिल्लीत 3 कॅन्सर रुग्णांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मंत्र्यांच्या पुढील एक वर्षाच्या वेतनात 30 टक्के कपात करण्याच्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे.

कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी COVID-19 बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

फ्रान्स येथे कोरोना व्हायरसमुळे 12,200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती AFP न्यूज यांनी दिली आहे.

 पंजाब येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असल्याची सुचना स्थानिक सरकारकडून देण्यात आली आहे. 

पुणे येथे कोरोना व्हायरसचे दिवसभरात 10 नवे रुग्ण आढळल्याने आकडा 176 वर पोहचल्याची माहिती महापौर मुलरीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाच्या 229 रुग्णांचे निदान, एकूण आकडा 1364 वर पोहचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

उत्तराखंड येथे आज एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मात्र राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 वर कायम असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वाधवान कुटुंबातील 23 जणांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याची परवागनी दिल्याने चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

आसाम येथे उद्यापर्यंत तब्बल 70 हजार क्वारंटाइन रुग्णांना डिस्चार्ज देणार असल्याची माहिती मंत्री हिंमता सरमा यांनी दिली आहे.

Load More

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झुंजत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रभाव भारत देशातही वाढताना दिसत आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या 5000 च्या पार गेली आहे. दरम्यान इटली, स्पेन यांसह इतर युरोपीयन राष्ट्रांमध्ये आणि अमेरिकेत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाने तेथे मृत्यूचे तांडव घातले आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनाने तब्बल 2000 लोकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Hydroxychloroquine हे औषध पुरवल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 1000 च्या वर गेला आहे. दिवसागणित वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या नक्कीच काळजी वाढवत असेल. मात्र तरी देखील काळजी करु नका, काळजी घ्या असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. दरम्यान आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त केलं आहे. राज्यात फिव्हर क्लिनिक्स, कोरोना बाधितांसाठी विशेष हॉस्पिटल्स अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण राज्यात सापडून 4 आठवडे पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप आपण तिसरा टप्पा गाठला नाही. ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे. दरम्यान मृत्यूदर वाढलेला दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी तंदुरुस्त राहण्याकडे भर देणे आवश्यक आहे. तसंच घराबाहेर पडताना मास्क लावणे आता बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून न फिरणाऱ्यांवर BMC कडून कारवाई करण्यात येणार आहे. तसंच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचा पर्याय राज्य सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जगभरातील कोरोना व्हायरसची भयंकर परिस्थिती पाहता कोरोनावर मात करण्यासाठी आपण सरकारच्या प्रयत्नांना सामूहिक सहकार्याची साथ देऊया.