आंध्रप्रदेशात (Andhra Pradesh) बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर या परिक्षेच नापास झालेल्या नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या (Students Die By Suicide) केल्याची घटना घडली आहे. 12 वी बोर्ड परीक्षेचे निकाल बुधवारी घोषित करण्याच आले होते. हे निकाल जाहीर झाल्यानंतर 9 विद्यार्थ्यांने आत्महत्या केली तर दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेने आंध्रप्रदेशातील राज्यातील जनता प्रचंड हादरली आहे.
या परीक्षेला 10 लाख विद्यार्थी बसले होते. अकरावीचा रिझल्ट 61 टक्के लागला असून बारावीचा निकाल 72 टक्के लागला आहे. इंटरमिजिएट प्रथम वर्षाच्या परीक्षा 15 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा 16 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. या परिक्षेसाठी एकूण 10 लाख 3 हजार 990 विद्यार्थी बसले होते. यापैकी 4.84 लाख विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षाची परीक्षा दिली होती, तर 5.19 लाख विद्यार्थी दुसऱ्या वर्षासाठी बसले होते. या परीक्षांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.
या घटनांमुळे आंध्र प्रदेशमध्ये खळबळ माजली आहे. भारताच्या महत्त्वाच्या कॉलेजांमधील आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीस डी. वाय. चंद्रचूड यांनी कॉलेज विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली होती. “आपल्या शैक्षणिक संस्था कुठे चुकत आहेत, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येतेय”, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.