Coronavirus Update In India: एका दिवसात देशात कोरोना व्हायरसचे 75,809 रुग्ण वाढले, एकुण बाधितांंची संख्या 42,80,423 वर
Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus In India: देशात मागील 24 तासात कोरोनाचे 75,809 नवे रुग्ण आढळुन आले आहेत यानुसार देशात आजवर कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांंची संख्या 42,80,423 (Coronavirus Total Cases)  इतकी झाली आहे. कालच्या दिवसभरात एकुण 1,133 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला असुन देशातील कोरोना बळींंचा (Coronavirus Deaths) आकडा 72,775 इतका आहे. आजवर कोरोनावर मात करुन 33,23,951 जणांंना डिस्चार्ज (COVID 19 Recovery) मिळाला आहे तर सध्या 8,83,697 अ‍ॅक्टिव्ह (Coronavirus Active Patients) रुग्णांंवर उपचार सुरु आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने (Union Health Ministry) माहिती दिली आहे. Coronavirus Recovery: देशात कोरोना रुग्णंंचा  रिकव्हरी रेट 77.31 टक्के- आरोग्य मंंत्रालय

देशात कोरोनाच्या जलद निदानासाठी रॅपिड अ‍ॅंटीजन टेस्ट ची संख्या दिवसागणिक वाढवण्यात येत आहे. मागील 24 तासात कोरोनाच्या एकुण 10 लाख 98 हजार 621 चाचण्या झाल्या आहेत ज्यानुसार आजवर घेण्यात आलेल्या एकुण चाचण्यांंचा आकडा 5 कोटी 6 लाख 50 हजार 128 इतका झाला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, कोरोनावरील संभाव्य लस म्हणजेच कोव्हॅक्सिन ची दुसरी क्लिनिकल चाचणी भारतात सुरु झाली आहे, भारत बायोटेक निर्मित या लसीचा डोस 12 ते 65 वयोगटातील 300 प्रतिनिधींंना देण्यात येणार आहे. उद्या सकाळपर्यंत लस मिळाल्यावर हा डोस दिला जाईल आणि पुढील चार दिवस या प्रतिनिधींंना निरिक्षणाखाली ठेवुन लसीचे परिणाम अभ्यासले जातील.