जल शक्ती मंत्रालयाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत देशभरात 2 कोटींहून अधिक घरांना नळपाणी जोडणी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे ग्रामीण व शहरी भागातील हागणदारीमुक्त अभियानाचा आढावा घेतला. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद. नियमित प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता प्रकल्पांची उपयोगिता व गुणवत्ता तपासावी- राज्यपालांचे निर्देश

कोरोना व्हायरस संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोल्हापूर जिल्ह्यात 11 ते 21 सप्टेंबर असा एकूण 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे बंधण असणार नाही. कोणावरही सक्ती केली जाणार नाही. परंतू, नागरिकांनी स्वत:हूनच निर्बंध पाळावे आणि जनता कर्फ्यूला सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे.

भारतीय सैन्याच्या प्रयत्नांमुळे 2 सप्टेंबर 2020 रोजी अप्पर सबनसिरीतील एलएसीच्या भारतीय बाजूने बेपत्ता झालेल्या पाच लोकांचा शोध घेण्यात आला. चीनी सैन्याने 8 सप्टेंबरला हॉटलाईनवर प्रतिक्रिया दिली आणि बेपत्ता भारतीय त्यांच्या बाजूला सापडले असल्याची पुष्टी केली. या लोकांना परत आणण्यासाठी लवकर चिनी सैन्याशी समन्वय साधला जाणार आहे. लेफ्टनंट कर्नल हर्ष वर्धन पांडे, पीआरओ डिफेन्स, तेजपुर यांनी ही माहिती दिली.

7 सप्टेंबर 2020 रोजी भारतातील कोरोना व्हायरस चाचण्यांनी 5 कोटींचा टप्पा केला. गेल्या 10 दिवसांत दररोज 10 लाखाहून अधिक चाचणी घेतल्या गेल्या आहेत. भारताने 7 सप्टेंबर 2020 पर्यंत देशभरात 5,06,50,128 नमुने तपासले आहेत, आयसीएमआर ने याबाबत माहिती दिली.

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चौकशी सुरु असलेल्या, रिया चक्रवर्तीला आज NCB कडून अटक करण्यात आली. ड्रग्ज प्रकरणाचा रिया चक्रवर्तीशी संबंध असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. आता रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,346 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,58,756 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे 887 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत एकूण 1,25,906 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 24,556 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात आज 20,131 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 13,234 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 380 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 9,43,772 झाली असून, त्यात 6,72,556 बरे झालेले रुग्ण आणि 27,407 मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यात 2,43,446 सक्रीय प्रकरणे आहेत.

सरकार टप्प्याटप्प्याने लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये, शाळेतील शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी ऐच्छिक आधारावर 9-12 वीचे विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील. 21 सप्टेंबरपासून यासाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

Load More

पूर्व लडाख सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) वर पुन्हा आज गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे समजत आहे. मागील तीन महिन्यांपासून भारत आणि चीनची सैन्य याठिकाणी एकमेकांंसमोर उभे ठाकले आहेत. चीन सैन्य हे LAC ओलांंडत असल्याचे भारताकडुन सांंगण्यात येत असताना चीनच्या ग्लोबल टाईम्स ने भारतीय जवानांंनीच LAC ओलांंडल्याचा दावा केला आहे. यापुर्वी भारतातील चीन दुतावासाने सुद्धा असाच आरोप लगावला होता.

दुसरीकडे, कोरोनावरील संभाव्य लस म्हणजेच कोव्हॅक्सिन ची दुसरी क्लिनिकल चाचणी भारतात सुरु झाली आहे, भारत बायोटेक निर्मित या लसीचा डोस 12 ते 65 वयोगटातील 300 प्रतिनिधींंना देण्यात येणार आहे यापैकी 15 जणांंचे स्क्रीनिंंग पुर्ण झालेय. उद्या सकाळपर्यंत लस मिळाल्यावर हा डोस दिला जाईल आणि पुढील चार दिवस या प्रतिनिधींंना निरिक्षणाखाली ठेवले जाईल.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान आज महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला असून भाजपतर्फे भाई गिरकर यांनी अर्ज भरला आहे.