इंदोरमध्ये आज 45 नवे कोरोना रुग्ण; 8 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jun 08, 2020 11:45 PM IST
कोरोना व्हायरस (Coranavirus) एक भयानक संकट. त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून घेतलेल्या लॉकडाऊन त्याहून अडचणीचा. घराबाहेर पडायचे नाही. घरात हाताला काम नाही. परिणामी साठवलेली पुंजी खात बसायचे. पण, ज्यांचे पोट हातावर चालते आणि त्यांच्याकडे बचतीची म्हणून काहीएक पुंजी नाही. त्यांचे काय? हा प्रश्न सरकारवर अधिकाधिक दबाव टाकणारा ठरला आणि अखेर लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला. परिणामी अनलॉक 1 सुरु झाला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मिशन बिगिनिंग अगेन म्हणत पुनश्च हरी ओम हा नारा दिला. त्यानुसार ठप्प झालेले राज्य हळुहळू पुन्हा एकदा सुरु होत आहे.
राज्यात आजपासून सरकारी कार्यालयांसोबतच खासगी कार्यालयंही सुरु होत आहेत. सरकारच्या निर्देशानुसार कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 10% कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच सरकरारने सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांतील लगबगही उठून दिसणार आहे. परिणामी हळूहळू राज्य पुर्वपदावर येऊ शकेल अशी अपेक्षा आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यातच लॉकडाऊन हटविण्यास सरकारने केलेली सुरुवात पाहता कोरोना रुग्णांची वाढ होणे अपेक्षित आहे. सरकारलाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे सरकारने यंत्रणा सज्ज ठेवली असून कोविड सेंटर्स उभा केली आहेत.
दरम्यान, राज्यातील दुकाने, उद्योग व्यवसाय सुरु होत असला तरी, सरकारने घालून दिलेली काही बंधणे, नियम उद्योगजक, व्यावसायिक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी बाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातूनच काम करावे (वर्क फ्रॉम होम) असे बंधन सरकारने ठेवले आहे. कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस आणि त्यासोबतच स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळिवरील ठळक घटना, घडामोडी यांबाबत जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.