ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये एका उपाहारगृहात आज दुपारी झालेल्या एल पी जी सिलिंडरच्या स्फोटात एक ठार, तर 11 जण जखमी; 8 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Aug 08, 2020 11:48 PM IST
(Air India Express Plane Crash) काल केरळच्या करीपुर येथे कोझिकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातात आतापर्यंत 2 पायलट्स सह 18 जणांंचा मृत्यु झाला आहे तर 127 जण रुग्णालयात आहेत या बाबत नागरी विमान उड्डाण मंत्री हरिपालसिंग पुरी यांनी शोक व्यक्त केला असुन ते सध्या केरळ विमानतळावर जात आहेत. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनारायी विजयन सुद्धा आज घटना स्थळी जाणार आहेत.
वंदे भारत मिशन अंतर्गत हे विमान दुबईहून 190 प्रवासी घेऊन येत होते. पायलटने टॅब्लेटॉप विमानतळाच्या धावपट्टीच्या शेवटी, फ्लाइटला शेवटी आणण्याचा प्रयत्न केला असावा, जेथे पावसाळ्यामुळे निसरड्या स्थितीमुळे विमान घसरुन हा अपघात झाला अशी माहिती पुरी यांंनी दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दुसरीकडे मान्सुन अपडेट (Maharashtra Monsoon Update) पाहायचा झाल्यास, आयएमडी उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांंच्या माहितीनुसार काल रात्रीपासुन पावसाने जरा विश्रांंती घेतली असली तर पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई व कोकणात आता 10-11 ऑगस्ट दरम्यान पुन्हा अति मुसळधार पाऊस होउ शकतो.