Live
गोव्यात एक COVID-19 रुग्ण झाला बरा, राज्यात कोरोना बाधितांची संख्या 6 वर; 8 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Apr 08, 2020 11:20 PM IST
जगभरावरील भीषण संकट म्ह्णून सिद्ध झालेल्या कोरोना व्हायरसची आता भारतात 4789 जणांना लागण झाली आहे, देशात सद्य घडीला 4312 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 124 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे, तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 353 इतकी आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र राज्याला बसला आहे. मागील 12 तासात राज्यातील 150 नव्या कोरोनाबाधित प्रकरणाच्या सहित रुग्णांची संख्या ही 1018 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी आहे.
दुसरीकडे आज लॉक डाऊन 15 वा दिवस आहे, भारतामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान देशातील स्थितीपाहून हा लॉकडाऊन वाढवला जाणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात तर हा लॉक डाऊन वाढवला जाईलच याचे संकेत काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान आज चैत्र पौर्णिमेच्या तिथीवर हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेछा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे संकट असल्याने भाविकांनी घरीच हनुमानाचे पूजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.