7th Pay Commission | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

केंद्र सरकार (Central Government) कडून काल (14 जुलै) सरकारी कर्मचार्‍यांच्या डीए (DA) मध्ये आणि निवृत्तीवेतन धारकांच्या डीआर (DR) मध्ये 11% वाढ केली आहे. ही 1 जुलै पासून लागू होणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांच्या बेसिक पगाराच्या आणि पेंशनच्या डीए, डीआर एकूण 28% झाला आहे. पण एरिअर्स (Arrears)बाबत मात्र एक बॅड न्यूज आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार, सध्या केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचा डीए 17% आहे. मागील वर्षी त्यामध्ये 4% वाढ करून तो 21% करण्यात आला होता. हा 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे. जून 2020 मध्ये 3% वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2021 मध्ये पुन्हा 4% वाढ देण्यात आली आहे. पण त्यांना लागू करण्यात आले नव्हते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही डीए वाढ फ्रीझ करण्यात आली होती.

आता केंद्र सरकारने फ्रीझ केलेले डीए आणि डीआर हे पुन्हा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 17% डीए, डीआर मध्ये 11% वाढ करत पूर्ण 28% केला जाणार आहे. सरकारच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सरकार डीए, डीआर चे कोणतेही हफ्ते देणार नाही.

जयदीप भटनागर यांची पोस्ट

सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांचे अलाऊंसेस, पगार आणि पेंशन ही सातव्या वेतन आयोगानुसार बदलण्यात आली आहे. दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात डीए मध्ये वाढ केली जाते.