7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या वेतन आयोगानुसार दिवाळीपूर्वीच मिळणार बंपर बोनस
Indian Money | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या श्रेणी ब आणि श्रेणी क तसेच राजपत्रित नसलेले कर्मचारी (Non-Gazetted Staff) या मंडळींना नॉन प्रॉडक्ट लिंक्ड बोनस (Non Product Linked Bonus) रुपात बंपर बोनस मिळणार आहे. केंद्र सरकारने 4 ऑक्टोबर रोजीच बोनस देण्याबाबतची घोषणा केली होती. मात्र आता या कर्मचाऱ्यंना आता दिवाळी बोनसही मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जे कर्मचारी नॉन प्रोडक्ट लिंक्ड बोनस (Non Product Linked Bonus) घेण्यासाठी पात्र नसतील अशा कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस मिळणार आहे. केंद्रीय कर्मचारी प्रदीर्घ काळापासून आपले वेतन, निवृत्तीवेतन आणि बोनस यात वाढ करण्याची मागणी करत होते. दरम्यान, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीवर मोहोर उमटवत दिवाळीपूर्वीच बोनस मिळणार असल्याची खुशखबर दिली आहे.

आजवरचा इतिहास पाहता केंद्र सरकार प्रतिवर्षी दिवाळी सणापूर्वी नॉन प्रोडक्ट लिंक्ड बोनसची घोषणा करते. बोनसच्या रुपात केंद्रीय कर्मचाऱ्यांना साधारण 30 दिवसांचे अतिरिक्त वेतन मिळते. अंकात बोलायचे तर काही कर्मचाऱ्यांच्या पगारात या रकमेमुळे 6900 रुपयांची वाढ होते. निमलष्करी दलालाही केंद्र सरकार बोनस देते. सरकारच्या वतीने निमलष्करी दल आणि सौन्य दल (Military force) कर्मचाऱ्यांच्या पगारात साधार 7000 रुपयांची वाढ होते. 4 ऑक्टोबररोजी केंद्र सरकारने काढलेल्या आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांचा सेवा कार्यकाळ हा सहा महिन्यांहून अधिक आहे. अशा कर्मचाऱ्यांना या बोनसचा लोभ घेता येईल असे, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसचा लाभ हा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळणार आहे. (हेही वाचा, 7th Pay Commission Update: खुशखबर! केंद्रीय कर्मचा-यांना सरकारकडून मिळणार दिवाळीचे खास गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता)

केंद्र सरकारने आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प च्या कर्मचाऱ्यांना मॉनेटरी बेनिफिटचा फायदा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आर्मी ऑर्डिनेंस कॉर्पच्या कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचा प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनसही मिळणार आहे. या बोनसच्या माध्यमातून क वर्गातील कर्मचाऱ्यांना 7000 रुपायांचा बोनस मिळणार आहे. तर, ड वर्ग कर्मचाऱ्यांना 1200 रुपयांचा बोनस मिळणार आहे. सोबतच केंद्र सरकारने आरोग्य मंत्रालयाच्या गैर-मंत्रालयीन कर्मचारी (Non-Ministerial Staff) वर्ग अ आणि वर्ग ब कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटल पेशेंट केअर भत्ता आणि पेशेंट केअर भत्ता देण्याचीही घोषणा केली आहे. एक महिना किंवा त्याहून अधिक काळ सुट्टीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळणार आहे.